मुंबई आणि वडापाव हे समीकरण अफलातूनच आहे. वडापाव हे मुंबईचं फक्त स्ट्रीट फूडच नाही तर दिवस-रात्र घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा आणि पोट भरणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे मुंबईकरांना वडापावविषयी विशेष अभिमान. पण, मुंबईकरांच्या सर्वात आवडत्या असलेल्या या पदार्थाचं चक्क जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ, फूड रायटर निजेला लाँसननं भरभरून कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईत आली होती. मायदेशी परतल्या नंतर तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडापावचा फोटो शेअर करून या पदार्थांचं भरभरून कौतुक केलं आहे. २०१७ मध्ये मी खाल्लेला सर्वोत्तम आणि चविष्ट पदार्थ कोणता असेल तर तो आहे मुंबईचा वडापाव अशा शब्दात तिनं वडापावची स्तुती केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews